Ads

---

बिहारच्या विजयाच्या शिल्पकार लाडक्या बहिणी…

By Xtralarge News

November 16, 2025 12:25 pm

Ads

बिहारच्या विजयाच्या शिल्पकार लाडक्या बहिणी…

नवी दिल्ली, दि. १६ नोव्हेंबर २५:-

बिहार मध्ये भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड JDU आणि घटक पक्षांच्या NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले.

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. महिला, शेतकरी, तरुण, विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेण्यात आले होते. लाडक्या बहिणींनीही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत साथ दिल्याने हा विजय मिळवता येणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांनी मत चोरीचे फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र जनतेने त्याला मतपेटीतून चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

जनतेने विकासाला आणि सुशासनाला स्पष्ट कौल दिला असून बिहारची आता खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष  J. P. नड्डा यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधून या विजयाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.

 

No comments to show.

Leave a Comment