Ads

--

स्था. स्व. संस्था निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार.

By Xtralarge News

November 9, 2025 9:03 pm

Ads

स्था. स्व. संस्था निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार.

चंद्रपूर,  दि. ९ नोव्हेंबर;

भाजप सत्ताकाळात अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. तर दुसरीकडे बेरोजगारी, महागाई आणि आसमानी संकटांत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी सरकारने दगा केला आहे. सत्तेच्या मदमस्तीत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आणि राज्याला कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटणाऱ्या या वोटचोरांना होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार राजा धडा शिकवतील. काँग्रेस पक्षाच्या तसेच सहकारी घटक पक्षांच्या पाठीशी मतदार राजा खंबीरपणे उभा असून, महापालिका ZP च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच बाजी मारेल असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे..

मूल येथील आढावा बैठकीत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की,  विखे घराण्याने अस्तित्वाची ओळख करून देणाऱ्या काँग्रेस पक्षावर टीका करताना काँग्रेस पक्षाचे उपकार विसरू नयेत. तर जमीन घोटाळ्यावरून “शेतकऱ्यांना वारंवार फुकट मागायची सवय लागली” असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही काय झाले हे कळेनासे आहे. महायुती सरकारच्या काळात शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा लुटारू महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी मतदार राजाने कंबर कसली असून, हा पक्षप्रवेश सोहळा म्हणजे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवी भरारी घेण्याची उमेद जागविणारा सोहळा आहे.

आयोजित सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही काँग्रेस पक्षाचे ध्येय, धोरण आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहनात्मक मार्गदर्शन केले. यानंतर भाजपचे प्रशांत समर्थ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सोबतच पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा, डोंगर हळदी आणि विविध गावांतील आम आदमी पक्ष तसेच इतर पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शेरकी यांनी केले. प्रास्ताविक गुरु गुरनुले यांनी केले, तर आभार नलिनी आडपवार यांनी मानले. आयोजित आढावा बैठकीस मूल व पोंभुर्णा तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment