पार्थ पवारांचे FIR मध्ये नाव का नाही ?
पार्थ पवारांचे FIR मध्ये नाव का नाही ?
मुंबई, दि. ८ नोव्हेंबर;
उपमुख्य मंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्यात महार वतनाची 40 एकर जमीन खरेदी घोटाळा प्रकरण रफादफा करण्यात आले आहे. हा व्यवहार रद्द केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे त्यावेळी कोणताही घोटाळा झाला नसल्याचे ही त्यांनी सांगितले…पण व्यवहार झाला नव्हता तर तो रद्द कसा होणार हा प्रश्न उनुत्तरीतच आहे.
अजित पवार यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र यांची भेट घेतली व त्यानंतर प्रसार माध्यमासमोर ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या जमीन व्यवहाराबाबत मी सविस्तर माहिती घेतली आहे. या प्रकरणात माझा अथवा माझ्या कार्यालयाचा कोणत्याही पद्धतीनं सहभाग नाही. यासंदर्भात कोणतीही मदत, हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून अथवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झालेला नाही. हा फक्त प्राथमिक करार असून याविषयी कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही तसंच जमिनीचा ताबाही घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पार्थ पवार याने तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर प्रकरणाची शासन नियुक्त समितीमार्फत सखोल चौकशी होईल आणि जे असेल ते सत्य समोर येईल. कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. मी आजवर सदैव कायदा, नियम आणि पारदर्शकतेच्या चौकटीत राहून काम करत आलो आहे आणि पुढेही हीच मूल्ये जपत काम करत राहीन, असा विश्वास मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला देतो, असे स्पष्ट केले…
अजित पवार यांनी भूमिका मांडली असली तरी अनेक प्रश्न उरतातच…
महार वतनाची 40 एकरचा जी जमीन सरकारची आहे याचा व्यवहार झालाच कसा.
1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी एवढ्या कमी किमतीत खरेदी कशी केली.
300 कोटी रुपयांवर स्टँम्प ड्युटी 21 कोटी होते पण सवलत घेऊन फक्त 500 रुपये का करण्यात आली.
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 48 तासात सर्व परवानग्या कशा मिळाल्या..
पार्थ पवार अमेडिया कंपनीचे 99% टक्के भागीदार असताना 1 % भागिदारी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावरच FIR मग पार्थ पवारांवर का नाही..
अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांना या व्यवहाराची कल्पना कशी आली नाही..
चोरी पकडली म्हणून आता सारवासारव व चौकशीचे नाटक आहे, असेच यावरून दिसते..
