Ads

--

बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको …

By Xtralarge News

November 8, 2025 9:33 am

Ads

बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको …

चंपारण, बिहार, दि ८ नोव्हेंबर :-

एनडीएने लालूप्रसाद यादव यांच्या “जंगलराज”ला पूर्णविराम दिला आहे. बिहार पुन्हा त्या काळात जाऊ नये, म्हणून आगामी निवडणुकीत NDA च्या सर्व उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चंपारण येथील एनडीएच्या प्रचार सभेत शिंदे यांनी विरोधकांवर घणाघाती प्रहार करत, “पाच पक्ष म्हणजे पांडव, तर विरोधक म्हणजे कौरव, आता निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर या कौरवांचा संहार करा!” असा जोरदार हल्ला चढवला.

राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधत शिंदे म्हणाले, “जे वोट चोरीचा आरोप करतात, त्यांनी त्यांच्या राजकारणात नोट चोरी केली आहे. काँग्रेसने नेहमी देशाची फसवणूक केली, आणि आता हार पत्करण्याची तयारी करत आहेत.” जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्यावर नाव न घेता प्रहार करत शिंदे म्हणाले, “थियरीत पास, पण प्रॅक्टिकलमध्ये फेल, असे काही लोक आज राजकारण शिकवत फिरतात..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या डबल इंजिन सरकारने बिहारच्या विकासाला वेग दिला आहे, हे त्यांनी ठळकपणे सांगितले. एनडीए सरकारने मागील काही वर्षांत अब्जावधी रुपयांच्या विकास प्रकल्पांना गती दिली आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, वीज, रस्ते, रेल्वे आणि सामाजिक कल्याण योजनांवर भर देण्यात आला. महिलांसाठीच्या ‘लाडली योजना’, सामाजिक सुरक्षा व आत्मनिर्भरतेच्या उपक्रमांमुळे बिहारमधील महिलांना नवे बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांवर भ्रष्टाचार, गुंडागिरी आणि अराजकतेचे आरोप करत स्पष्ट केले की “बिहारमध्ये विकास हवा असेल, तर एनडीए सरकारच हवे. विरोधकांकडे फक्त आरोप आहेत, आमच्याकडे काम आणि दृष्टिकोन आहे!” सभेतून शिंदे यांनी स्पष्ट संदेश दिला की, बिहार पुन्हा जंगलराजात जाणार नाही; बिहारचा मार्ग फक्त विकासाचा आहे, असे शिंदे म्हणाले..

No comments to show.

Leave a Comment