झीनत शबरीन युवक काँग्रेसला लाभलेला एक अलंकार..
झीनत शबरीन युवक काँग्रेसला लाभलेला एक अलंकार..
मुंबई, दि. ४ नोव्हेंबर २०२५
राजकारणात काही करुन दाखवण्याची जिद्द, दृष्ट निश्चय आणि संघर्ष करण्याचा इरादा झीनत शबरीन यांच्यात आहे. झीनत म्हणजे अलंकार आणि हा अंलकार युवक काँग्रेसला लाभला आहे असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले आहेत.
मुंबई युवक काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा झीनत शबरीन व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, राष्ट्रीय प्रवक्ते चरणसिंग सप्रा, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिंकारा, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेस प्रभारी पवन मजिठिया, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, शाह आलम शेख यांच्यासह युवक काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, झीनत शबरीला कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण तीची कष्ट करण्याची, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रचंड मोठा इच्छाशक्ती आहे. तीच्या घरच्यांनीही तीला राजकारणात जाण्याची परवानगी दिली आहे. ती नक्कीच युवक काँग्रेससाठी चांगले काम करेल अशी आशा व्यक्त करत शबरीन यांना शुभेच्छा देत हर्षवर्धन सपकाळ यांनी, “शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही”, या शब्दात आपल्या भाषणाचा शेवट केला.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यावेळी म्हणाले की, देशातील युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करेल त्यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. झीनतमध्ये संघर्ष करण्याचा क्षमता आहे, उर्जा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक काँग्रेस नक्कीच चांगले काम करेल आणि युवक काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे नाव उज्ज्वल करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत केला पाहिजे. ‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार काम केले पाहिजे. देशात महागाई, बेरोजगारी, मतोचोरी, सारखे असंख्य मुद्दे आहेत. बीएमसी मध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. पाच वर्षापासून नगरपालिका महानगरप पालिकांमध्ये निवडमुकी झालेल्या नाहीत. राज्य सरकार या पालिकांचा कारभार पहात असल्याने भ्रष्टाचार वाढला आहे. युवक काँग्रेसने जनतेचे मुद्दे घेऊन सरकारला जाब विचारला पाहिजे. राहुल गांधी लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांचे हात मजबूत करण्याचे काम केले पाहिजे.
शिवराज मोरे म्हणाले की, महाराष्ट्रात आज आव्हानात्मक परिस्थिती आहे, वर्षा बंगल्यावर देवाभाऊ नावाचा राक्षस असून राज्यात अनेक गंभीर घटना घडत आहेत. महायुती सरकारच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढू असे शिवराज मोरे म्हणाले.
मुंबई युवक काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष झीनत शबरीन म्हणाल्या, २००४ साली पंतप्रधानपदाची संधी चालून आली असतानाही सोनियाजी गांधी यांनी ती स्पष्टपणे नाकारली. सोनियाजी राजकारणातील सर्वांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. राजकीय क्षेत्र हे सेवा करण्याचे माध्यम आहे. काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबई शहरात झाला, राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील आहे त्या मुंबईच्या सुवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न अत्यत गंभीर असून आत्महत्यांचे प्रमाणही वाढेल आहे, याविरोधात एकजूट होऊन लढा द्यावा लागेल. बीएमसीच्या निवडणुकी लवकर होत आहेत या निवडणुकीत पक्षाला विजयी करण्यासाठी युवक काँग्रेस काम करेल असे शबरीन म्हणाल्या…
