Ads

---

राहुल गांधींचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद.

By Xtralarge News

October 29, 2025 10:20 pm

Ads

राहुल गांधींचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद.

बीड, दि. २९ ऑक्टोबर.

फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डाॅक्टर संपदा मुंडे प्रकरण काँग्रेस पक्षाने गंभीरपणे घेतले आहे. युवक काँग्रेस, महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डाॅक्टर संपदा मुंडे यांच्या आई व मुंडे कुटुंबातील लोकांशी फोनवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

“घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव आणेल”, असे आश्वासन त्यांनी दिले. राहुल गांधी यांनी संपदाच्या कुटुंबियांकडून व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहितीही घेतली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे जाऊन फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे आदी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment