Ads

--

कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची भाऊबीज…

By Xtralarge News

October 23, 2025 10:35 pm

Ads

कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची भाऊबीज…

इंदापूर, दि. २३ ऑक्टोबर  :

भाऊबीज हा केवळ सण नाही, तर नात्यांच्या जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि संस्कारांचा दिवस आहे. बहिणींचं आशीर्वाद आणि प्रेम हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं बळ आहे. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यातच दिवाळीचा खरा आनंद आहे.” अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

भाऊबीज हा सण म्हणजे भावंडांच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि नात्यांच्या दृढतेचा दिवस. याच भावनेने आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी तीनही बहिणींच्या उपस्थित साधेपणाने आणि भावनिक वातावरणात भाऊबीज सण साजरा केला. याप्रसंगी, मंत्री भरणे यांच्या परिवारातील सदस्य, कार्यकर्ते, स्थानिक महिला बचत गट प्रतिनिधी, शेतकरी बहिणी आणि काही गृहिणी बहिणी उपस्थित होत्या. यावेळी सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाचं औक्षण केलं. तर भरणे यांनीही बहिणींच्या पाया पडत आशीर्वाद घेतला आणि शुभेच्छा दिल्या.

 

भरणे म्हणाले, “भाऊबीज म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि नात्यांचं बंधन घट्ट करणारा दिवस. आपल्या संतपरंपरेनं आपल्याला शिकवलंय की भाऊ–बहिण हे केवळ रक्ताचं नातं नसतं, ते आत्म्याचं नातं असतं. ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताईचं प्रेम हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. नात्यांत समर्पण, माया आणि नि:स्वार्थ भाव असला की ते नातं काळाच्या पलीकडे जातं. त्यांच्यासारखं नातं जपण्याची प्रेरणा प्रत्येक भाऊ–बहिणीला आजच्या दिवशी मिळावी, हीच खरी भाऊबीज.”

No comments to show.

Leave a Comment