शेतकरी संकटात असताना दिवाळी कशी साजरी करणार.
शेतकरी संकटात असताना दिवाळी कशी साजरी करणार..
बारामती दि. १७ ऑक्टोंबर.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, त्याचं महत्त्वाचं कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होती.काही ठिकाणी पूर काही ठिकाणी महापूर होता. याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली, शेती निस्त उध्वस्त झाली नाही ती तिथली जमिनी खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्यादृष्टीने शेतीची जमीन हे त्याचे सर्वस्व आहे. त्याचे सर्वस्व वाहून गेले आहे. कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार? आणि म्हणून त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घ्यायचा निर्णय घेतला. असे शरद पवार म्हणाले.
दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. संकट येतात पण अशावेळी ज्यांच्या हातात राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढणे हातभार लावायचा. आजच्या राज्य सरकारने काही तोकडी रक्कम काही लोकांना जाहीर केली. पण नुकसानीच स्वरूप हे बघितलं तर या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले की, मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. इथे मी राजकारण आणू इच्छित नाही. पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा ही केली पाहिजे. आणि ती तयारी राज्य सरकारला आम्ही सुद्धा लोकांनी दाखवली पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आतापर्यंत दिसत नाही. त्यामुळे नाईलाजाने आजचा दिवस साजरा करायचा नाही, असा निर्णय आमच्या संघटनेने घेतला आहे. मी एवढं सांगू इच्छितो की, हे जे काही घडतंय ते दुःखद आहे, त्याबाबत मला अधिक भाष्य करायचे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले..
