FB_IMG_1757914927893

भारत-पाकिस्तान सामना खेळणं दुर्दैवी..

नाशिक, दि. १५ सप्टेंबर २५ ;

पहेलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांवर हल्ला करून त्यांना दहशतवाद्यांनी ठार मारले. मृतांचे नातेवाईक न्याय मागत आहेत. सरकार मात्र भारत-पाकिस्तान सामन्याला हाेकार देत आहे, हे माेठे दुदैव आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

नाशिक मध्ये पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरात बोलताना खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपा सरकार वर हल्लाबोल केला, त्या पुढे म्हणाल्या की, भाज सरकाा एकीकडे पाकिस्तानसोबत चर्चेला तयार नाही मात्र क्रिकेट मॅच खेळली जाते. ऑपरेशन सिंदूरला याप्रमाणे आपण सर्वांनी पूर्ण ताकतीने पाठिंबा दिला होता. पहिले देश मग राज्य मग पक्ष आणि नंतर कुटुंब हे आपले धोरण आणि पक्षाचा विचार आहे. भारत पाकिस्तानची मॅच खेळली याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे.

पक्षाच्या नेत्यामागे उभे राहा, पक्ष तुमच्यामागे उभा राहिल. काेणाचा नवरा , काेणाची बायकाे काय करते, याच्याशी देणेघणे नाही. आपल्याला काेणाच्या घरात शिरायचे नाही. जाे काेणी चुकीचं काम करीत असेल, त्याविराेधात आपण रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन सुप्रियाताई सुळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *