Ads

--

उपराष्ट्रपतीपदी NDA चे CP राधाकृष्णन..

By Xtralarge News

September 10, 2025 11:08 am

Ads

उपराष्ट्रपतीपदी NDA चे CP राधाकृष्णन..

मुंबई दि १० सप्टेंबर २५:
देशाच्या उपराष्ट्रपतीपदी NDA चे सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. राधाकृष्णन यांना 425 मतं पडली तर विरोधी INDIA आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं पडली.

तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या राधाकृष्णन यांनी वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सक्रियपणे जनसेवा करण्यास सुरुवात केली. दोन वेळा खासदार होऊन कालांतराने तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम पाहिलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल  असताना त्यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांचा प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव त्याचप्रमाणे प्रामाणिकपणा व संवेदनशील दृष्टीकोन हा देशवासीयांसाठी निश्चितच अतिशय महत्त्वाचा ठरेल.

नव नियुक्त उपराष्ट्रपती C. P.  राधाकृष्णन यांच्याशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त केले तसेच भावी कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या.

आपल्या संदेशात ते म्हणतात की, राधाकृष्णन यांची एनडीए आघाडीतर्फे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड झाली तेव्हाच त्यांच्या विजयाची खात्री होती आणि आघाडीतला घटक पक्ष म्हणून शिवसेनेने आपला पाठिंबा त्यांना दिला होता. राज्यपाल म्हणून राधाकृष्णन यांनी राज्यात दिलेले योगदान आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले मार्गदर्शन अतिशय बहुमूल्य आहे. विविध विकासकामे, शैक्षणिक सुधारणा त्याचप्रमाणे सामाजिक ऐक्य व सद्भावना वाढविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय होते असेही शिंदे म्हणाले..

No comments to show.

Leave a Comment