Ads

--

CM ची ‘ती’ जाहिरात नक्की कोणी दिली ?

By Xtralarge News

September 8, 2025 11:50 am

Ads

CM ची ‘ती’ जाहिरात नक्की कोणी दिली ?

मुंबई, दि. ८ सप्टेंबर २५ ;

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करतानाची जाहिरात राज्यातील प्रमुख दैनिकात झळकली आहे पण ही जाहिरातच आता वादाचा मुद्दा बनली आहे. या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे भाजपा व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.

या जाहिरात वरून रोहित पवार व बावनकुळे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे, पवार बावनकुळेंना म्हणतात की, बावनकुळे साहेब, तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल.

या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?

या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले आहेत..

No comments to show.

Leave a Comment