स्वातंत्र्यासाठी गोऱ्यांविरुद्ध लढलो आता मतचोरांविरुद्ध लढू.

0
IMG-20250815-WA0270

स्वातंत्र्यासाठी गोऱ्यांविरुद्ध लढलो आता मतचोरांविरुद्ध लढू..

मुंबई, दि. १५ ऑगस्ट..:

देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लाखो लोकांनी त्याग केला, जेलमध्ये गेले, काहींनी बलिदानही दिले. महात्मा गांधी व पंडित नेहरुंच्या नेतृत्वाखाली करो या मरो चा नारा देत जात, पात, धर्म बाजूला ठेवून देश एकत्र आला शहीद भगतसिंहांना फाशी झाली, पंडित नेहरु ११ वर्षे जेलमध्ये होते. ही चळवळ गावखेड्यात पर्यंत पसरली होती आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी गोऱ्यांविरुद्ध लढलो होतो आता आता मतचोरांविरुद्ध लढण्याची वेळ आली आहे असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडला यावेळी बोलमाता खा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्य की, आज लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. लोकशाहीत निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत पण या निवडणुकांमध्ये घोटाळा झाला आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतदान चोरी केली आहे. जननायक राहुलजी गांधी यांनी ही मतचोरी पुराव्यासह उघड करुन दाखवली. मतचोरीचा हा प्रकार अत्यंत भयंकर असून लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. राहुलजी गांधी बिहारमध्ये मतचोरीविरोधात यात्रा काढत आहेत. मुंबईत असे प्रकार होणार नाहीत यासाठी आपल्याला बारीक लक्ष देऊन काम कराव लागणार आहे असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *