नागपूरची दिव्या देशमुख 64 घरांची राणी!
नागपूरची दिव्या देशमुख 64 घरांची राणी!
मुंबई दि.२९ जुलै :-
महाराष्ट्राची प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिनं आत्मविश्वासपूर्ण खेळ आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर जॉर्जिया येथे झालेल्या FIDE महिला वर्ल्डकप स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.तिने भारताची ८८ वी ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
दिव्या देशमुख हिने अतिशय हुशारी, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली आहे.तिचं हे यश युवा पिढीला प्रेरणा देणारं आहे.तिच्या यशामुळे संपूर्ण देशाचं नाव अभिमानानं उंचावलं असून तिच्या कामगिरीमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल,असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
‘या ऐतिहासिक विजयाबद्दल दिव्या, तिचे पालक व प्रशिक्षक यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाईल’ असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
