शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबध्द.

0
71a70b70-adfb-43bc-bf40-3c4d89ba55c9

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबध्द.

मुंबई, दि. २४ जुलै २५ :-

राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून करू, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

जालिंधर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेची व्याप्ती राज्यभर वाढवून जिल्हानिहाय शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत असून विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर सरकारच्या माध्यमातून ठोस उपायोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मदत करण्याचे निश्चत करण्यात आले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे, केरळ सरकारच्या धर्तीवर १६ भाजीवर्गीय पिकांना शासन हमीभाव देणे, साडे सात एचपी पर्यंत वीज बिल माफ करणे यासारख्या प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

केरळ सरकारने १६ भाजीवर्गीय पिकांना शासन हमीभाव देताना नक्की कोणते निकष ठरवले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट तयार करून केरळला पाठवू, त्यात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी नेते जालिंदर पाटील यांनाही पाठवू असे शिंदे यांनी सांगितले.  एकरकमी FRP मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊन प्रयत्न करू, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी विशेष उपाययोजना करू असेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *