शीशे के घर में रहनेवाले दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते.

0
IMG-20250720-WA0153

शीशे के घर में रहनेवाले दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते.

मुंबई, दि. २१ जुलै २०२५;

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी UBT गटाला दिला.

उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला.

गोरेगाव मधील नेस्को येथे “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत सिद्धेश कदम यांनी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात ते बोलत होते. ते म्हणाले की, रामदास कदम मला माहित आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. निवडणुका आल्या की काही लोक बदनामीची खेळी खेळतात. निवडणुका येतात आणि जातात पण त्यांनी लक्षात ठेवावे, ज्यांचं घर काचेचं असतं, त्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा त्यांनी यावेळी आरोप करणाऱ्यांना दिला.

आपल्या सरकारने मुंबईतील रस्ते काँक्रिटचे केले. येत्या अडीच वर्षांत संपूर्ण मुंबईचे रस्ते काँक्रिटचे होतील. रस्त्यांचे रिपेअरिंग होणार नाही, त्यामुळे त्यांचा पैसा बंद होईल अशी टीका त्यांनी UBT वर केली. मराठी माणसासाठी त्यांनी काहीच केलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की ४० लाख घरे मराठी माणसाला मिळायला हवीत. आम्ही हे स्वप्न पुढे नेत आहोत. ३५ लाख घरे उभारण्याचे काम सुरू केले आहे. मराठी माणसाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी काम सुरू आहे. जे मराठी लोक मुंबईबाहेर गेले, त्यांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सिद्धेश कदम, योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या कामाचं कौतुक करताना सांगितले की, येथे उपस्थित नेते हे शाखाप्रमुख राहिले आहेत. शाखा हे न्यायाचे मंदिर आहे. शिवसैनिक वर्षानुवर्षे तिथे जनतेसाठी काम करत आले आहेत. लोकांचा विश्वास आहे की, आपल्याला तिथे न्याय मिळतो. मी देखील जनतेच्या सेवा कार्यातून आणि शाखेतील कामगिरीमधूनच मुख्यमंत्री झालो आणि सत्तेतील माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

आजही तीच दिशा पुढे नेण्याचे काम चालू आहे. आपण अनेक योजना सुरू केल्या. यात लाडकी बहिण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकरी योजना – या सर्व योजनांचा लाभ लोकांना होत आहे. लाडकी बहिण योजनेमुळे अडीच कोटी बहिणींना फायदा झाला असून मी त्यांचा लाडका भाऊ झालो आहे. जिथे जिथे जातो तिथे त्यांच्या प्रेमाचा मान मला मिळतो. लाडकी बहिण योजनेचा अनेकांनी विरोध केला होता, पण आम्ही ती सुरू केली आणि त्याचा थेट फायदा आमच्या बहिणींना झाला. ही योजना एक गेम चेंजर ठरली आणि त्यामुळंच आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की , पूर्वी नागरिकांना कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेरे मारावे लागत होते, तरीसुद्धा त्यांचे काम होत नव्हते. त्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नव्हते. पण आता सरकार थेट त्यांच्या दारी पोहोचत असल्यामुळे लोकांना मोठा फायदा होत आहे. आजपर्यंत सुमारे ५ कोटी नागरिक या उपक्रमाचे लाभार्थी झाले आहेत आणि ही संख्या अजून वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *