Ads

-

Rapido बाईक ला परिवहन मंत्र्यांचा दणका..

By Xtralarge News

July 3, 2025 11:29 am

Ads

Rapido बाईक ला परिवहन मंत्र्यांचा दणका..

मुंबई, दि. ३  जुलै;

राज्य शासनाने कोणत्याही बाईक ॲपला अद्यापि अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरित्या अँप द्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगेहात पकडले.

शासनाने नुकतेच इ-बाईक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी -शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत.

या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारले असता, मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाही. असे ” सरकारी ” उत्तर मिळाले. तथापि , त्याची उलट तपासणी करण्याचे हेतूने मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप वर स्वतः अनोळखी नावाने बाईक बुक केली.

पुढच्या दहा मिनिटांमध्ये सदर बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामध्ये हजर झाली. अशाप्रकारे अनाधिकृतरित्या ” बाईक ॲप ” चालवणाऱ्या संस्थेचे भांडा -फोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केले.

आता, खुद्द मंत्री महोदयांना खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर काय कारवाई होईल? याचे औतुक्य लागून राहिले आहे.

No comments to show.

Leave a Comment