Ads

--

माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन मागे..

By Xtralarge News

July 2, 2025 1:15 pm

Ads

माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन मागे..

मुंबई, दि. २ जुलै २५ ;

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन औपचारिकरित्या मागे घेण्यात आले.

दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुळक यांचे पुन्हा पक्षात स्वागत करून निलंबन मागे घेतल्याचे अधिकृतरित्या घोषित केले.

याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप आणि कुणाल चौधरी हेही उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment