हरित ऊर्जा विकासाचे प्रकल्प पूर्ण करा.

0
IMG-20250613-WA0108

हरित ऊर्जा विकासाचे प्रकल्प पूर्ण करा..

मुंबई, दि.१३ जून २५ :

जनतेला स्वस्त दरात व जास्तीत जास्त वीज उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी ऊर्जा विभागाने कालबध्द नियोजन करावे. आगामी काळात हरित ऊर्जा विकासावर भर देण्याची गरज असून वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऊर्जा क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची आणि गेम चेंजर असलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करा. पीएम सुर्यघर: मोफत वीज योजनेमध्ये राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी महाऊर्जा ने सर्वेक्षण पूर्ण करून या कामाला गती द्यावी. मॉडेल सोलर व्हिलेजसाठी महाऊर्जा व महावितरण कंपनीने संयुक्तपणे काम करावे. महाऊर्जा, निर्मिती व पारेषण विभागातील प्रत्येक प्रकल्पाची कामे गती शक्ती योजनेच्या धर्तीवर विहित वेळेत पूर्ण करावीत गळती कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करून वीज वापरासाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थाकडील वीज देयकाच्या थकबाकी वसूलीची योजना, भविष्यकाळातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीज वितरण यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. आगामी काळात हरित ऊर्जा विकासावर भर देण्याची गरज आहे. हायड्रोजन परिसंस्थेच्या विकासासाठी धोरणातंर्गत करण्यात येणारे संशोधन व विकास प्रकल्प, कौशल्य विकास यावर देखील भर देण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *