Ads

-

नक्षलवाद्यांच्या हाती भारताचे संविधान..

By Xtralarge News

June 7, 2025 11:05 am

Ads

नक्षलवाद्यांच्या भारताचे संविधान..
गडचिरोली, ७ जून ;

कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या 12 नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. शस्त्रांसह शरणागती पत्करणारे अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भारताच्या संविधानाची प्रत भेट दिली.
यापूर्वी शरणागती पत्करलेल्या 13 पूर्वाश्रमीच्या नक्षल्यांचा एक सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता, त्याला हजेरी लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावाला भेट दिली. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. सायंकाळी त्यांनी सी-60 जवानांचा सत्कार केला आणि त्यांना अत्याधुनिक एके-103 शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल, बुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान केली. जिल्हा नियोजन विकास निधीतून 19 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेटप्रुफ वाहनांच्या चाव्या त्यांनी पोलिस दलाकडे सुपूर्द केल्या.

या दौर्‍यात मंत्री आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, पोलिस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment