Ads

---

मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात.

By Xtralarge News

May 28, 2025 8:58 pm

Ads

मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात.

मुंबई, २८ मे २०२५ –

मिठी नदी सफाई आणि नालेसफाईच्या कामात तब्बल ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया यांची चौकशी सुरू असून, डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असल्याने आदित्य ठाकरेंचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.

संजय निरुपम म्हणाले, “मिठी नदीच्या सफाईसाठी गेल्या २० वर्षांत १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले, तरीसुद्धा ही नदी आजही पूर्णपणे स्वच्छ झालेली नाही. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट असून, राज्य सरकारने याबाबत विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे. या घोटाळ्यात पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल व दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. २००५ ते २०२२ दरम्यान मुंबई महापालिकेत उबाठा गटाचे वर्चस्व होते आणि त्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कोणालाही कंत्राट मिळत नसे, हे सर्वश्रुत आहे.”

डिनो मोरियावर आरोप करताना निरुपम म्हणाले की, “तो फक्त या प्रकरणात सहभागी नाही, तर मुंबईतील ड्रग्ज रॅकेटमध्येही त्याचे नाव चर्चेत आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि डिनो मोरियावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या दोघांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.” असे निरुपम म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment