जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, ‘जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.’
Ads
माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंग यांचे निधन.
Ads
मुंबई, दि. 27 सप्टेंबर:
माजी केंद्रीयमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. जसवंत सिंह यांचे सकाळी ६.५५ वाजता निधन झाले. सहा वर्षांपासून ते कोमात होते. सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळला. २०१४ मध्ये भाजपनं सिंह यांना बाडमेर मंतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी टिकीट नाकारलं होतं. त्यावेळी जसवंत सिंह यांनी अपक्ष निवडणुक लढले होते. मात्र त्यांना हार पत्करावी लागली. त्याचवर्षी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळं ते सहा वर्ष कोमामध्ये होते.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभागृहात त्यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केलं होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “ जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.”
No comments to show.
Leave a Comment