अनुष्का शर्मा गावसकरांवर का भडकली?

0
20200926_144918

मुंबई, दि. 26 सप्टेंबर:

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्यात कालपासून शाब्दिक सामना सुरु आहे. अनुष्काने गावसकर यांच्या एका विधानावर नाराजी व्यक्त करत त्यांना सुनावले होते. यावर उलट सुलट चर्चा सुरू असतानाच गावसकर यांनी अनुष्काने घेतलेले आक्षेप नाकारत तीला सुनावले..
गावसकर म्हणतात, ” मी आणि आकाश चोप्रा समालोचन करत होतो. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये खेळाडूंना जास्त सराव करायला वेळ मिळाला नाही आणि त्यामुळेच त्यांना लय सापडत नाही, असे आकाश म्हणत होता. त्यावेळी मी त्याला बोललो की, विराटलाही लॉकडाऊनमध्ये जास्त सराव करण्याची संधी मिळाली नाही. लॉकडाऊनमध्ये अनुष्काबरोबर विराट आपल्या इमारतीमध्ये क्रिकेट खेळत असल्याचे मी पाहिले. त्यामुळे विराट अनुष्काबरोबर लॉकडाऊनमध्ये सराव करत होता, असे मी म्हटले. त्यामध्ये काही चुकीचे आहे, असे मला तरी वाटत नाही.”

अनुष्काची इन्स्टा पोस्ट…

अनुष्काने इन्स्टावर पोस्ट करून गावसकर यांच्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला होता. अनुष्का या पोस्ट मध्ये म्हणत,

अनुष्काची इन्स्टा पोस्ट…

अनुष्काने इन्स्टावर पोस्ट करून गावसकर यांच्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला होता. अनुष्का या पोस्टमध्ये म्हणत, “मिस्टर गावस्कर मी आपला सन्मान करते पण मला तुमची कमेंट आवडली नाही. मी तुम्हाला प्रत्युत्तर देऊ इच्छिते. मिस्टर गावस्कर आपण माझ्या पतीच्या खेळीबद्दल बोलताना माझ्या नावाचा उल्लेख केला. अनेक वर्षांपासून मला माहिती आहे की क्रिकेटर्सच्या खाजगी आयुष्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करता. आपल्याला वाटत नाही का की आम्ही देखील त्याचे हकदार आहोत?”
आपण दुसऱ्या कोणत्याही शब्दात माझ्या पतीच्या खेळावर टीका करू शकला असतात. परंतू आपण टीका करत असताना त्यामध्ये माझं नाव देखील घेतलं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे बरोबर केलंय?”, असे अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *