Ads

-

अंबाजोगाईत तरुणीला मारहाण करणा-यांना कठोर शिक्षा करा.

By Xtralarge News

April 19, 2025 12:10 pm

Ads

अंबाजोगाईत तरुणीला मारहाण करणा-यांना कठोर शिक्षा करा.

मुंबई, दि. १९ एप्रिल २०२५;

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येची घटना जगाने पाहिली आहे. बीडमध्ये आका गँग, खोके गँग अशा गँग कार्यरत असून बीडमधील अत्याचार थांबत नाहीत. आता एका तरुण महिला वकिलाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सरकारकडे थोडी लाज शरम बाकी असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी व कठोर शिक्षा करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या एका तरुणीला गावातील ध्वनी प्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन रिंगण करून बेदम मारहाण केली. काठ्या आणि लोखंडी पाइप वापरून झालेल्या हल्ल्यामुळे महिला बेशुद्ध पडली. तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हा प्रकार अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. एका वकील महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment