EVM हॅक करून निकाल बदलता येतात!

0
EVM g

EVM हॅक करून निकाल बदलता येतात!

मुंबई, दि. १२ एप्रिल.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर EVM अनेक शंका, आक्षेप घेतले जात असताना भारतातील निवडणूक आयोग मात्र तसे मानायला तयार नाही. ईव्हीएमध्ये गडबड आहे हे सातत्याने सांगितले जाते. आता अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनीही निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणे हॅक केले जाऊ शकतात, असे सांगितल्याने चर्चेला उधाण आले आहे.

निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणे हॅक केले जाऊ शकते म्हणून अमेरिकेत बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची गरज आहे असे तुलसी गॅबार्ड यांनी सांगितले. टेस्लाचे एलोन मस्क यांनीही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत ईव्हीएम रद्द केले पाहिजे असे म्हटले होते.

ईव्हीएम बद्दल विरोधी पक्षातील काँग्रेस व इतर पक्ष ईव्हीएमवर आक्षेप घेत आहेतच पण आता सत्तेवर असलेले भारतीय जनता पक्षानेच पहिल्यांदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या होत्या. आता ते सत्तेत असल्याने ईव्हीएमवर बोलत नाहीत. तर आपल्या ईव्हीएम सुरक्षित आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जगातील प्रगत देशही ईव्हीएमचा वापर करत नाहीत तर भारतच का करत आहे हा प्रश्न आहे. ईव्हीएमवर सातत्याने शंका घेतली जात असल्याने चर्चा तर होणारच त्यामुळे पुन्हा ईव्हीएमचे भूत वर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *