Ads

-

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या ७ तारखेला होणार.

By Xtralarge News

April 12, 2025 4:44 pm

Ads

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या ७ तारखेला होणार

मुंबई, दि १२ एप्रिल;

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनासंदर्भात मंत्रालयात वित्त सचिवांची भेट घेऊन एसटी महामंडळाचे विविध सवलती पोटी शासनाकडे थकीत असलेले १०७६ कोटी रुपये तातडीने दयावेत अशी आग्रही मागणी केली त्यानंतर १२० कोटी रुपये तातडीने देण्याचे मान्य केले. भविष्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या ७ तारखेला निश्चित होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोला दौऱ्यावर असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन रखडलेल्या वेतन प्रश्नावर मार्ग काढावा अशी विनंती केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना संपर्क साधून एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनासाठी १२० कोटी रुपये तातडीने देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वित्त सचिव सौरभ विजय यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी तातडीने १२० कोटी रुपये देण्याचे मान्य केले. त्यामुळे येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन अदा होईल अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. उरलेले ९४६ कोटी तीन टप्प्यांमध्ये महामंडळाला देण्याचे देखील यावेळी अर्थ सचिवांनी मान्य केले आहे. एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगारासाठी लागणारी रक्कम वित्त विभागाने आगाऊ स्वरूपात द्यावी, जेणेकरून भविष्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार नाही असेही सरनाईक म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment