मुंबईकरांकडून कचराकराच्या नावाखाली ‘लगान’ वसुली!

0
images - 2025-03-03T122906.286

मुंबईकरांकडून कचराकराच्या नावाखाली ‘लगान’ वसुली!

मुंबई, दि. २ एप्रिल ;
मुंबई महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क नावाखाली कचराकराचा भार मुंबईकरांवर टाकण्याचा प्रस्ताव बनवला आहे. सामान्य मुंबईकरांना अदानीच्या मेगालूटसाठी ‘लगान’ देण्यास राज्यातील अदानी सरकार भाग पाडत आहे. हे न्यू ईस्ट इंडिया कंपनी राज असून काँग्रेस ते चालू देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ च्या कलम ६१(अ) आणि ६१(क) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन- म्हणजेच घनकचरा गोळा करणे, काढणे, वाहतूक करणे आणि टाकणे – हे बीएमसीचे बंधनकारक कर्तव्य आहे. तरीही अदानी सरकार आता ही याला सशुल्क सेवा बनवू इच्छित आहे. सरकारने मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लादण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. घराच्या किंवा व्यवसायाच्या आकारानुसार हा शुल्क १०० रुपये ते ७,५०० रुपयांपर्यंत असून हे अन्याय व क्रूर आहे. आणि सर्व अदानीच्या लगान वसूलीला निधी देण्यासाठी केले जात आहे.अदानीला धारावीकरांना मुलुंड आणि देवनारच्या कचऱ्याच्या ढिगात टाकायचे आहे.

देवनार हे एक सक्रिय डंपिंग ग्राउंड असताना अदानी सरकारने बीएमसीला तिथला ‘परंपरागत कचरा’ काढून जमीन साफ करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईकरांसाठी नाही तर जमिनीचा एक भाग कवडीमोल किमतीत अदानीला देण्यास भाग पाडत आहे. या उपक्रमाचा खर्च ३,००० कोटी रुपये असून हा खर्च तुम्ही सामान्य मुंबईकर भरणार आहात

मुंबईकर पैसे देईल, कचरा साफ करेल आणि अदानी त्याच जमिनीवर ताबा मिळवेल… हे सगळं कशासाठी तर पुन्हा मुंबईकरांनाच तिथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ढकलण्यासाठी…हा दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा आहे.

अदानी सरकार अदानींचा नफा वाढवण्यासाठी दिवसरात्र काम करत आङे आणि मुंबईकरांना त्याचा खर्च भागवण्यास भाग पाडते. घनकचरा व्यवस्थापनाचे नवीन प्रस्तावित उपनियमांमध्ये स्वच्छ मुंबईची हमी न देता दंडाच्या रक्कमत प्रचंड मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यावर ३१ मे पर्यंत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवल्या आहेत. मुंबईकरांनी अदानींच्या लगानला विरोध करावा आणि या अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढावे असे आवाहन करत मुंबईकरांवर अदानींच्या लगानला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *