Ads

---

कुणाल कामराचा बोलवता धनी मातोश्रीवर.

By Xtralarge News

March 25, 2025 2:44 pm

Ads

कुणाल कामराचा बोलवता धनी मातोश्रीवर ..

मुंबई,  दि. २५ मार्च

कुणाल कामरा याने ठाकरे गटाची सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अवमानजनक गाणे केले. कुणाल कामरा हा संजय राऊतचा खास मित्र असून त्याच्या स्टुडिओसाठी मातोश्रीवर पैसे देण्यात आले. संजय राऊत आणि ठाकरेंच्या सांगण्यावरुन कामराने विकृत गाणे केले, असा आरोप शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला.

कुणाल कामराने संविधानातील भाषा स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आहे. स्टॅंडअप कॉमेडिअन म्हणून शिवीगाळ करणे, निंदा करणे ही कलाकृती नाही तर विकृती आहे. त्याला आता शिवसैनिक धडा शिकवणारच असा इशारा निरुपम यांनी दिला. ते पुढे म्हणाले की २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उठाव केला. या उठावाला लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत लोकांनी स्वीकारले आणि शिवसेनेला भरभरुन मतदान केले.

कुणाल कामरा याच्या विकृतीचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पाठराखण केली. कामरा हा राऊतचा खास मित्र आहे. त्याला अशा प्रकारे उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी करण्यासाठी उबाठाकडून पैसे देण्यात आल्याचा संशय निरुपम यांनी यावेळी व्यक्त केला. कामरा हा डावी विचारसरणीचा कार्यकर्ता असून तो काँग्रेसच्या इकोसिस्टमचा भाग बनला आहे. कामरा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी कामरा याचे संबंध आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून पैसे घेऊन अशा प्रकारची राजकीय नेत्यांची बदनामी करण्याचे काम कामरा करतोय, असा आरोप निरुपम यांनी केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बदनामी करणारे गाणं ज्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आले त्यासाठी मातोश्रीवरुन कामराला पैसे देण्यात आले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सांगण्यावरुनच कामराने उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी केली, असा आरोप निरुपम यांनी केला.

No comments to show.

Leave a Comment