Ads

--

बीड जिल्हा सद्भावना जोपसणारा!

By Xtralarge News

March 10, 2025 12:11 pm

Ads

बीड जिल्हा सद्भावना जोपसणारा!

बीड, दि. १० मार्च ;

सद्भावना पदयात्रेने, ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ हा राहुल गांधी यांचा संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहचवला आहे. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

मस्साजोमधून निघालेली सद्भावना पदयात्रा दोन दिवस व ५१ किलोमीटरचा प्रवास करून बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सद्भावना मेळाव्याने सांगता झाली. यावेळी ते बोलत होते.

थोरात पुढे म्हणाले की, बीड जिल्हा हा सद्भावना जोपसणारा आहे. बीड जिल्ह्याची आजची जी परिस्थिती आहे ती कधीच अशी नव्हती. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा आहे. विठ्ठलाच्या वारीत जसा वारकरी एका ऊर्जेने चालतो तीच ऊर्चा या पदयात्रेत दिसली. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपद्धताने करण्यात आली. राज्यघटना हे आपले तत्वज्ञान असेल तर तिथे समाजात भेदभावाला स्थान नाही. मानव धर्म हा खरा धर्म व विठ्ठल हा त्यांचा देव आहे. राज्यात पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीला व संविधानाला धोका हा तो वेळीच ओळखा असे आवाहन करून संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली.

 

No comments to show.

Leave a Comment