Ads

--

तरुणाला अमानुष मारहाण करणा-यांवर कारवाई करा.

By Xtralarge News

March 6, 2025 11:41 am

Ads

तरुणाला अमानुष मारहाण करणा-यांवर कारवाई करा.

जालना, दि ६ मार्च २५ ;

भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील कैलास बोराडे या तरूणांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

महाशिवरात्रीच्या दिवशी अन्वा येथील रहिवासी असलेल्या कैलास बोराडे या तरुणास कार्ला जानेफळ येथील वटेश्वर मंदिरात भागवत दौंड व नवनाथ दौंड यांनी मारहाण करून भट्टीत गरम केलेल्या सळईने सर्व अंगावर डाग देऊन अतिशय अमानुषपणे अत्याचार केले. बोराडे याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पोलिस अधिक्षकांशी फोन करुन घटनेची सविस्तर माहिती घेतली. या घटनेतील एक आरोपी अटकेत आहे. दुसर्‍याचा शोध तातडीने लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेश त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले.

कैलास बोराडे या तरूणांच्या भावाने आणि कुटुंबातील सदस्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कैलासच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याबद्दल कुटुंबियांना आश्वस्त केले.

No comments to show.

Leave a Comment