D munde

… म्हणून मी राजीनामा दिला!

मुंबई, दि. ४ मार्च:

संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला असली तरी मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा देत आहे असे व्टिट केले आहे. धनंजय मुंडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे, असे मुंडे यांनी व्टिटमध्ये म्हटलेले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *