‘शिवनेरी’वर ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा.

0
FB_IMG_1739944523387

‘शिवनेरी’वर ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा.

पुणे, दि. १९ फेब्रुवारी २५;

शिवनेरी किल्ल्यावर ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी महिला भगिनींनी पारंपारिक पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला. तर त्यानंतर विविध संस्थांच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांची अतिशय नेत्रदीपक अशी प्रत्यक्षिके सादर करण्यात आली. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तिघांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्यावर आपण शिवजयंती साजरी करत आहोत ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. महाराजांचे गडकोटकिल्ले हे त्यांनी आणि हजारो मावळ्यांनी दाखवलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने १३ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यात शिवनेरी किल्ल्याचाही समावेश आहे. राज्याचा पर्यटन विभाग, उद्योग विभाग यांची नुकतीच आढावा बैठक घेऊन त्यांना एकत्रितपणे काही किल्ल्याचे विशेष सर्किट तयार करून तिथे सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विकासकामे पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.

यावेळी मंत्री आशिष शेलार, आमदार अतुल बेनके, आमदार शरद सोनावणे, आमदार अमोल मिटकरी आणि हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *