कोरिया-भारत मैत्री प्रश्नमंजुषेला मोठा प्रतिसाद!

0
IMG-20200923-WA0104

कोरोना संकटातही २० शाळांमधील १००९३ विद्यार्थ्यांचा सहभाग.

मुंबई, दि. २३ सप्टेंबर:
भारत कोरिया मैत्री प्रश्नमंजुशा स्पर्धा द्वितीयला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून कोरोना महामारी असतानाही या स्पर्धेसाठी तब्बल २० शाळांमधील १००९३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्याला कोरियाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. भारतातील कोरियन सांस्कृतिक केंद्राने मुंबई परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंच्या सर्वात मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले होते.
कोरियाचे मुंबईतील काउंसील जनरल किम डोंग हे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या प्रश्नोत्तर स्पर्धेतून भारतीय विद्यार्थ्यांना कोरियाची संस्कृती व सभ्यता जाणून घेण्याची संधी मिळत आहे.

कोरोनामुळे स्पर्धा ऑनलाईन….
या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला ६ दिवस ५ रात्रीच्या कोरिया सहलीची संधी मिळणार आहे तर इतर १४ विजेत्यांना ३९ हजार रुपयांचा रोख पक्षीस दिले जाणार आहे.
कोरिया-भारत जोडण्याचा प्रयत्न…
या स्पर्धेचा मुख्य उद्देश हा भारत आणि कोरिया यांच्यातील मैत्री दृढ करणे असून भारतीय विद्यार्थ्यांना कोरियाच्या महान संस्कृती व सभ्यतेचा परिचय करुन देणे हा आहे. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी कोरिया बद्दलची विस्तृत माहिती दिली.
अनाश्रुताला मिळाला कोरिया सहलीचा मान.
कांदिवलीच्या पवार पब्लिक स्कूलच्या अनाश्रुता गांगुली ही या स्पर्धेत प्रथम आली असून तीला कोरियाला भेट देण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेआधी कोरियाच्या संस्कृतीबद्दल फारशी माहिती नव्हती पण स्पर्धेमुळे कोरियन संस्कृती समृद्ध व गौरवशाली असल्याचे समजले असे अनाश्रुता म्हणाली. मला खूप आनंद झाला असून हा अनुभव मी शब्दात व्यक्त करु शकत नाही असेही अनाश्रुती म्हणाली. कोरियाला भेट देण्याबद्दल अनाश्रुता खूपच उत्साही असून या भेटीने कोरियाची आणखी जवळून ओळख होण्यास मदत होईल असे ती म्हणाली.
खार पश्चिम येथील जसुदबेन एमएल स्कूलची विद्यार्थ्यांनी तारिणी पिडिया हिला १० हजार रुपयांचे दुसरे बक्षीस मिळाले आहे. या स्पर्धेत भाग घेणे हा वेगळाच अनुभव होता. या स्पर्धेमुळे कोरियाबद्दल जवळून माहिती मिळाली. कोरिया आणि भारताचे संबंध मजबूत आहेत हे समजले असून कोरियन भाषा शिकण्याची यातून प्रेरणा मिळाली, असे ती म्हणाली.
यासंदर्भातील अधिक माहितीसाठी श्री. नवीन शर्मा ०९८१००८६०४० या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा अथवा [email protected] याव र मेल करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *