Ads

---

विधानसभेचे निकाल अनाकलनीय.

By Xtralarge News

January 31, 2025 10:37 pm

Ads

विधानसभेचे निकाल अनाकलनीय.

मुंबई, दि. ३१ जानेवारी ;

विधानसभेच्या निकालावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संशय व्यक्त केला आहे. लोकसभेला काँग्रेसला १३ खासदार आले आणि विधानसभेला १५ आमदार ? शरद पवारांचे ८ खासदार निवडून आले त्यांचे फक्त १० आमदार येतात ? आणि अजित पवारांचा फक्त १ खासदार निवडून आला त्यांचे ४२ आमदार येतात? या मतदानावर जाऊ नका लोकांनी मतदान केले आहे पण ते मतदान कुठेतरी गायब झाले आहे. अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा? असे राज ठाकरे म्हणाले.

 

मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, अजित पवारांच्या ५ जागा निवडून येतील असे चित्र असताना ४० पेक्षा जास्त आमदार कसे काय विजयी झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सातवेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले पण या निवडणुकीत १० हजार मतांनी हरले? राजू पाटील यांना त्यांच्या गावातील १४०० लोकांपैकी एकही मत पडले नाही हे कसे शक्य आहे? मराठवाड्यातला मनसेच्या एका नगरसेवकाला साडेपाच हजार मते पडली होती आणि आता विधानसभेला फक्त अडीच हजार मते मिळाली? असे प्रश्न उपस्थित करून लोकसभा निवडणुकी नंतर अवघ्या ६ महिन्यात एवढा फरक कसा काय पडतो असे राज ठाकरे म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment