पवारांकडून १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स…
मुंबई दि. २३ सप्टेंबर:
राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.
आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली.
सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचनाही शरद पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली. शरद पवार यांनी कार्यतत्पर आणि जनतेची काळजी करणारा नेता कसा असावा याचे पुन्हा एक नवे उदाहरण घालून दिले आहे.
कोरोनाच्या पेशंटसाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन महत्वाचे असून बाजारात मात्र हे इंजेक्शन मिळवण्यात मोठ्या अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत असतात. या इंजेक्शनचा काळा बाजार केला जात असून अव्वाच्या सव्वा किमतीला विकले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. शरद पवार यांनी याआधीही रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिली आहेत.
