राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

0
IMG-20250125-WA0261

राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. २६ जानेवारी;

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत लोकशाहीचे रक्षण व मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आदोलन केल तसेच पत्रकार परिषदाही घेतल्या. नागपूरमध्ये प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार व निवडणूक आयोगावर तोफ डागली. मुंबईत प्रोफेशनल काँग्रेसचे प्रविण चक्रवती व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यवतमाळमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

कोल्हापुरात खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आले. अहिल्यानगर मध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. पुणे, सोलापूर, नाशिक, नांदेड, बीड, जालना, लातूर, वाशीम, पैठण, ब्रम्हपुरी सह जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करण्यात आले.

25 जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *