राजकीय स्वार्थासाठी सुरु असलेली भोंदूगिरी थांबवा !

0
images (74)

राजकीय स्वार्थासाठी सुरु असलेली भोंदूगिरी थांबवा !

मुंबई, दि. २१ जानेवारी;

बांगलादेशी घुसखोर वांद्रे पश्चिमपर्यंत आलेत वांद्रे पुर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही… म्हणून राजकीय स्वार्थासाठी सुरु असलेली भोंदूगिरी थांबवा, असा सल्ला देत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.

 

अभिनेते सैफ अली खान यांच्या घरी घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर उबाठा गटाकडून भाजपाला लक्ष करण्याचा प्रयत्न झाला. त्याला उत्तर देताना अँड आशिष शेलार यांनी आपल्या “एक्स” पोस्टमधून उबाठावर जोरदार पलटवार केला आहे.

अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात पहा चमत्कार ..भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार. बांग्लादेशी घुसखोर बांद्रयापर्यंत आले म्हणून उबाठाचे “छोटे आणि मोठे” आज केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या नावाने बोटं मोडत आहेत…? वरुन आम्ही हिंदुत्व सोडले नाही म्हणून नेहमीच्या फुसक्या सोडायला पण विसरत नाही ?

सभेत दाखवण्यापुरते हातात रुद्राक्षांच्या माळा घालून फिरणाऱ्या महाराष्ट्रातील भोंदू, मतलबी, स्वार्थी हिंदुत्ववाद्यांना आमचा थेट सवाल आहे.

भाजपाची सत्ता असलेल्या आसाम, त्रिपुरा मधून घुसखोरी होत नाही. मग घुसखोरी कुठून होते? ठाकरेंच्या प्रिय दिदी ममता दीदींची सत्ता असलेल्या पश्चिम बंगाल मधून बांग्लादेशीयांची घुसखोरी सुरु आहे. या राज्यात सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात करण्यास दिदींचा विरोध आहे. मग तुमच्या प्रिय दिदींना का विचारत नाही घुसखोरी बद्दल? असा सवाल शेलार त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *