परळीत विधानसभा निवडणुकीत २०२ बुथवर हल्ले..

0
download (5)

परळीत विधानसभा निवडणुकीत २०२ बुथवर हल्ले..

मुंबई दि. १० जानेवारी ;

परळी मतदार संघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गँग करायची असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख देखील उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनामध्ये ईव्हीएम आणि निवडणुकी संदर्भात अनेक शंका निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रात जात होते. परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 396 बुथ आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या धांदळी नंतर उच्च न्यायालयाने 122 बुथ अतिसंवेदनशील असल्याचे म्हटले होते. या बुथवर अतिरिक्त सुरक्षा पूरवा असे म्हटले होते. या बुथवर सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची होती. मात्र या निवडणुकीत 201 बुथवर हल्ले झाले होते. तर 101 बुथ कॅप्चर करण्यात आले होते असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निवडणूक आयोग बेशरम लोकांचा अड्डा झाला आहे व तो सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना आमचे आव्हान आहे की, बूथ कॅप्चरिंगवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे.परळीमध्ये बूथ कॅप्चर करताना गोट्या गितेचा व्हिडीओ आम्ही दिलाय, त्याला ताब्यात घेणार का? निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी, संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी जबाब त्यांनी जनतेसमोर द्यावे. गोपीनाथराव मुंडे जेव्हा बीडचे नेतृत्व करत होते तेव्हा इतका माजोरडेपणा तिथे नव्हता. जातीय वादाच्या नावाखाली तुम्ही कुणाला वेडे बनवत आहात? बीडचं वाटोळं करणाऱ्या एसपी, कलेक्टर व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

यावेळी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले की, मतदानाच्या वेळी मतदान केंद्रात मतदान करण्याचा अधिकार मतदारांना नव्हता मतदारांना मतदान कार्ड दाखवल्यानंतर त्यांच्या बोटावर शाही लावण्यात येत होती. मात्र त्यांचा मतदानाचा अधिकार हा दुसराच व्यक्ती ईव्हीएमचा बटन दाबून बजावत होता असेही राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *