Ads

--

सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न.

By Xtralarge News

January 4, 2025 8:15 pm

Ads

सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न.

मुंबई दि. ४ जानेवारी २०२५;

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. गरीबाची कोणीच बाजू घेण्यासाठी तयार नाही. हे सर्व प्रकरण दडपण्याच्या दिशेने जात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी निधन प्रकरणावर कोणीही काहीही बोलायला तयार नाही. ना राज्य सरकार ना महाराष्ट्र पोलीस कोणीच याबद्दल बोलत नाहीत. पोलीस माहिती देण्यास तयार नाही, ना सरकार माहिती द्यायला तयार आहे. पण उद्रेक झाला तर मग आहेच लाठीचार्ज. संविधान जपायचे, पण या संविधान जपण्यासाठी गेलेल्यांची हत्या झाल्यानंतर बघत बसायचे.

No comments to show.

Leave a Comment