Ads

---

राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे नौटंकी.

By Xtralarge News

December 23, 2024 5:48 pm

Ads

राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे नौटंकी.

नागपूर,दि. २३ डिसेंबर;

परभणी येथे घडलेली घटना निश्चितच दुर्दैवी असून घटनेतील आरोपी मनोरुग्ण आहे. आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तरीसुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी राहुल गांधी हे परभणीचा दौरा करत आहेत. राहुल गांधी यांचा परभणी दौरा हा नौटंकी आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

बावनकुळे पुढे म्हणाले की, मागासवर्गीय, ओबीसी असे सर्व समाज राज्यात एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असून कोणताही समाज त्यांच्या या राजकारणाला बळी पडणार नाही. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले. डॉ. आंबेडकर हे संसदेच्या कोणत्याही सभागृहात येऊ शकणार नाहीत, यासाठी राजकारण केले. त्यामुळे जनतेलाही काँग्रेस आणि राहुल गांधी यांची नौटंकी कळत असल्याचे चन्द्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment