Ads

---

संसदेत गुंडागर्दी करणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा करा.

By Xtralarge News

September 21, 2020 10:28 pm

Ads

मुंबई दि. 21 सप्टेंबर:

संसदेत धक्काबुक्की करीत गोंधळ माजवीत गुंडागर्दी करणाऱ्या खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी अतिप्रमाणात गोंधळ करीत राज्यसभेच्या पावित्र्याचा भंग केला. राज्यसभा; लोकसभा ही लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत. राज्यसभेत ज्या पद्धतीने गोंधळ घालत गुंडागर्दी करण्यात आली त्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो.

विरोधी खासदारांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. विरोध करण्याचा आहे. मात्र विरोध करताना सर्व मर्यादा ओलांडून गुंडागर्दी करणे योग्य नाही. जे खासदार अशी गुंडागर्दी संसदेत करतील त्यांचे राज्यसभेतील सदस्यत्व 6 वर्ष आणि लोकसभेतील सदस्यत्व 5 वर्ष म्हणजे पूर्ण कार्यलकाल रद्द करण्याचा नवीन कायदा संसदेने करावा अशी मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले. या मागणीचे पत्र आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभा सभापती वैंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्षांना पाठविणार आहे असे रामदास आठवले म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment