Ads

---

भाजपच्या गुंडगिरीला भित नाही..

By Xtralarge News

December 22, 2024 11:43 am

Ads

भाजपच्या गुंडगिरीला भित नाही..

मुंबई, दि. २२ डिसेंबर ;

भारतीय जनता पक्षाचे नेते गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा अमपान करून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते दादागिरी करत आहेत. भाजपा युवा मोर्चाच्या काही गुंडांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेला हल्ला भ्याड होता. अशा हल्ल्याला काँग्रेसचा कार्यकर्ता कधीच भिक घालत नाही. पळकुट्यांसारखे मागून हल्ला काय करता? भाजपामध्ये हिम्मत असेल तर मी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात असताना हल्ला करुन दाखवा, असे आव्हान खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

 

संसदेच्या अधिवेशनाचे सुप वाजताच आज मुंबई आल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची पाहणी केली व कार्यालयातील कर्मचारी व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्याकडून माहिती घेतली. दक्षिण मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष मंदार पवार व इतर जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची GT hospital मध्ये जावून विचारपूस केली.

पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, हे काँग्रेसचे कार्यालय आहे, इथे देशभक्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी देशासाठी कार्य करतात. इथे येऊन आमच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे हाताळले नाही, हल्लेखोरांना ताब्यात घेऊन सोडून दिले व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधातच खोट्या आरोपांखाली केस दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बाबासाहेबांबद्लचे विधान चुकीचे आणि अक्षम्य आहे, त्याबद्दल त्यांनी माफीही मागितलेली नाही. काँग्रेस अशा हल्ल्याला घाबरत नाही भाजपाच्या गुंडगिरीला संविधानाच्या मार्गाने चोख उत्तर देऊ, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

No comments to show.

Leave a Comment