39cd70f0-baa5-11ef-80b6-d14320c49d10.jpg

कोणाला कोणते खाते मिळाले? पहा यादी.

नागपूर, दि. २२ डिसेंबर.

भाजपा युती सरकारच्या मंत्र्यांचे अखेर खातेवाटप झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं आहे. बावनकुळेंना महसूल खाते देण्यात आले आहे.

खातेवाटपः
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ –  वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन.
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7. गणेश नाईक –  वन
8. दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10. धनंजय मुंडे  – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12. उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13. जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

14. पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा
16. अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19. दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय.

20. अदिती तटकरे – महिला व बालविकास
21. शिवेंद्रराजे भोसले –  सार्वजनिक बांधकाम
22. माणिकराव कोकाटे – कृषी

23. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे – कापड
26. संजय शिरसाट – सामाजिक न्याय.
27. प्रताप सरनाईक – वाहतूक
28. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
29. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31. आकाश फुंडकर – कामगार
32. बाबासाहेब पाटील – सहकार
33. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण.

राज्यमंत्री  (State Ministers )

34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम  – गृहराज्य शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *