Ads

---

भाजपाच्या गुंडगिरीला भिक घालत नाही..

By Xtralarge News

December 19, 2024 10:29 pm

Ads

भाजपाच्या गुंडगिरीला भिक घालत नाही..

मुंबई, दि. १९ डिसेंबर ;

गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचे उद्धारक डाॅ. बाबासाहेब आणि आंबेडकरी चळवळीचा अपमान केला आहे. आता त्यांना वाचवण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा गुंडगिरीवर आली आहे.भाजपच्या ५० गुंडांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला…खुर्च्या फेकल्या, पोस्टर्स फाडले, आणि मालमत्तेची तोडफोड केली.. ही गुंडशाही नाही तर काय आहे. पण यांच्या गुंडगिरीला आम्ही भिक घालत नाही असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

भाजपाच्या हल्ल्याचा निषेध करत वर्षा गायकवाड यांनी भाजपावर तोफ डागली. काँग्रेसचे बब्बरशेर कार्यकर्ते आहोत ते घाबरणारे नाहीत. याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे की नाही? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करून भाजपच्या या गुंडांवर कठोर कलमांतर्गत कारवाई करावी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी. सत्तेत असले तरी महाराष्ट्र भाजपची गुंडशाही खपवून घेणार नाही असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

No comments to show.

Leave a Comment