Ads

--

महायुतीला आशीर्वाद देणाऱ्या जनतेपुढे नतमस्तक!

By Xtralarge News

December 16, 2024 12:04 pm

Ads

महायुतीला आशीर्वाद देणाऱ्या जनतेपुढे नतमस्तक!

नागपूर, दि. १६ डिसेंबर ;

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला असून सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याची संधी मिळाल्याची जाणीव आम्हाला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर नगरीत भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. विमान तळावरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर फडणवीसांच्या रॅलीला सुरुवात झाली. स्वागत रैली दरम्यान महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. भगवा झेंडा फडकवत, लेझीम खेळत आणि ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत…विजयश्रीचे प्रतीक हनुमानाची गदा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागपूरकरांनी स्वागत केले. लक्ष्मीभवन चौकात स्वागत रॅलीचा समारोप झाला.

नागपूरकरांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, महायुतीला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी देणार्‍या महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आणि “एक है तो सेफ है” हा नारा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फडणवीस यांनी आभार मानले..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आम्ही विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर हे सरकार 24 तास जनतेसाठी काम करणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment