भाजपा युती सरकारच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी.
भाजपा युती सरकारच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी.
नागपूर, दि. १५ डिसेंबर ;
भाजपा युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर येथील अधिवेशनाच्या पूर्वसंधेला पार पडला. ३३ आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाचे 19 , शिवसेनेचे 11 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष उईके, शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईक,मकरंद पाटील,आकाश फुंडकर, प्रकाश आबिटकर, योगेश कदम असे नवीन चेहरे या मंत्रिमंडळात आहेत.
छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांचा मात्र या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही.
राज्याचे नवे मंत्रीमंडळ
(कॅबिनेट मंत्री )
1. चंद्रशेखर बावनकुळे
2. राधाकृष्ण विखे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. चंद्रकांत पाटील
5. गिरीश महाजन
6. गुलाबराव पाटील
7. गणेश नाईक
8. दादा भुसे
9. संजय राठोड
10. धनंजय मुंढे
11. मंगलप्रभात लोढा
12. उदय सावंत
13. जयकुमार रावल
14. पंकजा मुंडे
15. अतुल सावे
16. अशोक उईके
17. शंभूराजे देसाई
18. आशिष शेलार
19. दत्तात्रय भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रसिंहराजे भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25. संजय सावकारे
26. संजय शिरसाठ
27. प्रताप सरनाईक
28. भरत गोगावले
29.मकरंद जाधव पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबिटकर
राज्यमंत्री
1.माधुरी मिसाळ
2.आशिष जयस्वाल
3.पंकज भोयर
4.मेघना बोर्डीकर
5.इंद्रनिल नाईक
6.योगेश कदम
