Ads

-

देशात सर्वात महाग वीज महाराष्ट्रात!

By Xtralarge News

December 12, 2024 5:21 pm

Ads

देशात सर्वात महाग वीज महाराष्ट्रात!

मुंबई, दि. १२ डिसेंबर :

वीज बिलात ३०% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोक मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत. ३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे अशी माहिती माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, राजस्थानमध्ये प्रति युनिटला ७.५५ – ८.९५ रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये ३.३४ ते ६.८० रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट ५.९० रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट ५.१६ ते १७.७९ रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत.

वीज बिलात ३०% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment