Ads

-

बसेसचा पुरवठा वेळेवर न करण्या-या संस्थांना नोटिस पाठवा.

By Xtralarge News

December 12, 2024 5:08 pm

Ads

बसेसचा पुरवठा वेळेवर न करण्या-या संस्थांना नोटिस पाठवा.

मुंबई, दि. १२ डिसेंबर ;
एसटी महामंडळाकडे १४ हजार बसेस असून उपलब्ध प्रवाशांसासाठी त्या अत्यंत अपु-या पडत आहेत. त्यापैकी अनेक बसेस अंत्यत जुन्या झाल्या आहेत तर काही बसेस  कालबाहय होण्याच्या उंबरठयावर आहेत. हि वसुस्थिती लक्षात घेता निविदा पात्र संस्थानी नविन बसेस वेळेत पुरवठा करणे अत्यंत आवश्यक होते. तथापी,  त्या संस्था बसेस पुरविण्याबद्दल सक्षम का नाहीत? याची शहानिशा करुन  त्यांना  कारणे दाखवा नोटिस पाठवुन दया असे निर्देश एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या ‍निर्दोष बसेस उपलब्ध करुन देणे या त्रिसुत्रीवर यापुढे भर देण्यात येत आहे. प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील असे भरत गोगावले यांनी सांगितले.

कर्मचा-यांचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि सुटटया भागांची वाढती किंमत विचारात घेऊन २०२१ पासुन प्रलंबित असलेली एसटीची ‍तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाईल अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली.

No comments to show.

Leave a Comment