राज्यघटनेच्या शिल्पकारास अभिवादन..
राज्यघटनेच्या शिल्पकारास अभिवादन..
मुंबई, दि. ६ डिसेंबर ;
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर येथील चैत्यभूमीवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्धवंदना म्हणण्यात आली. तसेच मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील हक्कांना मानवी प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिल आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याची घोषणा आम्ही केली आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
