Ads

---

अखेर एकनाथ शिंदे CM वरून DCM बनले!

By Xtralarge News

December 6, 2024 12:15 am

Ads

अखेर एकनाथ शिंदे CM वरून DCM बनले!

मुंबई दि. ५ डिसेंबर:

एकनाथ शिंदे सरकार मध्ये सहभागी होणार का, मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर पडदा पडला. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गृहमंत्री, नगरविकास वर शिंदे अडून बसल्याची चर्चा होती पण त्यांचे काहीही चालले नाही आणि शेवटी त्यांना DCM ची शपथ घ्यावी लागली.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाबा येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नवनियुक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शानदार सोहळ्यात शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कुलाबा येथील पोहचून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.
000

No comments to show.

Leave a Comment