Ads

-

लग्नाचा बार उडवणारांसाठी महत्वाची बातमी.

By Xtralarge News

June 9, 2020 2:11 pm

Ads

लग्नासाठी येणाऱ्या ५० लोकांची जबाबदारी मंगल कार्यालय व आयोजकांची.

सोलापूर, दि. ८ जून २०२०

कोरोनाच्या काळात लग्न करणाऱ्यांसाठी आणखी काम व जबाबदारी वाढलेली आहे. लग्न सोहळ्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमामंध्ये आणखी अटी व शर्थी घालण्यात आल्या असून या अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी ही मंगल कार्यालय मालकासह ज्या कुटुंबातील लग्न आहे त्यांच्यावर असणार आहे. लग्नासाठी फक्त ५० लोकांनाच बोलवता येणार असून सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व नियम पाळावे लागणार आहेत.

एकावेळेस लग्न समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालयात कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित सर्व व्यक्तींची संख्या ही ५० पेक्षा जास्त असणार नाही. कोणताही आजारी व्यक्ती लग्नाला येणार नाही यासह शासनाच्या आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करुन कारवाई केली जाणार आहे. सरकारी नियमात राहूनच लग्नाचा बार उडवा अन्यथा नियम मोडल्यावर सर्वांची वरात थेट जेलमध्ये जाऊ शकते.

No comments to show.

Leave a Comment